दिल्लीत एक घडामोड, उद्धव ठाकरेंना मोठा झटका, फक्त एवढेच खासदार उरणार?

मुंबई | शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार (Shivsena MPs) बंड करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. या 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिल्लीमध्ये दाखल झालेत.

दिल्लीत दाखल होताच एकनाथ शिंदे आधीच दिल्लीतील (Eknath Shinde in Delhi) एका हॉटेलमध्ये थांबलेल्या खासदारांना भेटण्यासाठी गेले. आमदारांपाठोपाठ आता खासदारांनीही एकनाथ शिंदे गटात सामील होण्याची वाट धरल्याने हा उद्धव ठाकरेंसाठी निश्चितच मोठा धक्का आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत कृपाल तूमाने, हेमंत गोडसे, धैर्यशील माने,राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे सदाशिव लोखंडे,भावना गवळी, संजय मंडलिक,श्रीकांत शिंदे यांच्यासह बारा खासदार उपस्थित होते. 12 खासदार उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

बंडखोर खासदार आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. यावेळी राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील 12 खासदारांच्या गटाला मान्यता देण्याची मागणी करण्यात येणार आहे.

एकनाथ शिंदे स्वतः या खासदारांसोबत पंतप्रधान मोदींची भेट घेऊन शिवसेना अधिकृतपणे एनडीएचा घटकपक्ष असल्याचं जाहीर करणार असल्याचं समजतंय.

महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीत या बंडामुळे कुठलं सत्तांतर तर होणार नाहीय. पण अनेक महत्वाच्या विषयांवर हे खासदार भाजपला साथ देण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

घराबाहेर पडत असाल तर सावधान; ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता 

राष्ट्रपती निवडणुकीत ‘त्या’ आमदारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका! 

उद्धव ठाकरेंना जोर का झटका; नाही नाही म्हणत ‘हा’ बडा नेताही शिंदे गटात सहभागी

56 वर्षांच्या शिवसेनेच्या राजकारणात हे पहिल्यांदाच घडलं, एकनाथ शिंदेंचा आणखी एक मोठा निर्णय 

उद्धव ठाकरेंचा कारवाईचा सपाटा सुरूच, आणखी एका बंडखोर आमदारांची हकालपट्टी