नवी दिल्ली | आम आदमी पार्टीचं सरकार कन्हैया आणि अन्य ९ लोकांविरुद्ध देशद्रोहाचा खटला चालवण्यासाठी दिल्ली पोलिसांना परवानगी देणार नसल्याचं कळतंय.
फेब्रुवारी 2016 मध्ये जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या संकुलात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यादरम्यान कथित देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या होत्या. या कार्यक्रमात सहभागी होऊन देशविरोधी घोषणा दिल्याचा कन्हैया आणि अन्य लोकांवर आरोप आहे.
जेएनयूत झालेल्या या कार्यक्रमातील गोंधळाचे पडसाद देशभरात उमटले होते. त्यानंतर जेएनयू विद्यार्थी परिषदेचा तत्कालीन अध्यक्ष कन्हैया कुमारला अटक करण्यात आली होती.
दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी याप्रकरणी आपलं मत मांडलं आहे. पोलिसांनी सादर केलेल्या साक्षीपुराव्यांनुसार कन्हैया आणि अन्य विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा खटला चालवला जाऊ शकत नाही, असं सत्येंद्र जैन यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणाची ज्या कोर्टात सुनावणी सुरु आहे, तिथे आप सरकारचं हे म्हणणं मांडलं जाणार आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल आणि दिल्ली पोलिसांना देखील या प्रकरणी दिल्ली सरकारचं म्हणणं काय आहे, त्याची कल्पना दिली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
भारतासाठी आजची रात्र ऐतिहासिक ठरणार! – https://t.co/3ZmDMvY2ZU #Chandrayaan2theMoon
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 6, 2019
कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर- https://t.co/P1AUQUGJOZ #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 6, 2019
छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर सुप्रिया सुळेंचा खुलासा! – https://t.co/IFD29FQipv @supriya_sule @ChhaganCBhujbal @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 6, 2019