देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ व्याख्यानावर काँग्रेसचा आक्षेप; शिक्षणमंत्र्यांना धाडलं पत्र

नागपूर | सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या व्याख्यानाचं नागपूरमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. त्यांच्या या व्याख्यानाला काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केल्याचं पाहायला मिळालं आहे.

काँग्रेसच्या नेत्यांनी फडणवीसांच्या व्याख्यानावर आक्षेप घेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र पाठवलं आहे. व्याख्यानाच्या स्थळावरुन काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतल्याचं समोर आलं आहे.

धरमपेठ शिक्षण संस्थेच्या परिसरात देवेंद्र फडणवीस यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. राजकीयदृष्या संवेदनशील असलेले कार्यक्रम शाळा किंवा शैक्षणिक परिसरात घेऊ नयेत, असे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. याच्याच आधारे काँग्रेसचे महासचिव संदेश सिंगलकर यांनी कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे.

दरम्यान, शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यांना समर्थन करणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, अशी मागणी सिंगलकर यांनी शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“बाळासाहेबांची नक्कल करायला सुद्धा अक्कल लागते”

-लोकांकडून टॅक्स मधासारखा वसूल करायला हवा; सरन्यायाधीश बोबडे यांचं मत

-“भीमा कोरेगावचं सत्य बाहेर येईल म्हणूनच केंद्राने NIA कडे तपास सोपवला”

-“केंद्राचा ‘हा’ निर्णय घटनाबाह्य; केंद्र सरकारला कोणाला तरी वाचवायचंय”

-आधी आर. आर. आबा भिडेंना वाचवायचे अन् आता जयंत पाटील वाचवतात; आंबेडकरांचा गंभीर आरोप