अभिनेता दिलीप कुमार यांची प्रकृती नाजूक, पत्नी सायरा बानो भावूक होत म्हणाल्या…

मुंबई | अभिनेता दिलीप कुमार यांनी नेहमीच आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज देखील दिलीप कुमार यांना प्रेक्षक भरभरून प्रेम देतात. दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी झाला आहे. सध्या ते 97 वर्षांचे आहेत. गेल्या काही वर्षांपासून दिलीप कुमार यांची प्रकृती ठीक नाही.

दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो नेहमीच दिलीप कुमार यांची काळजी घेताना दिसतात. या दोघांच्या लग्नाला तब्बल 54 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज देखील सायरा बानो दिलीप कुमार यांच्यावर तेवढंच प्रेम करतात जेवढं त्या पूर्वी करायच्या. सध्या त्या दिलीप कुमार यांची देखभाल करत आहेत. त्यांनी नुकतंच एका वृत्त वाहिनीला दिलीप कुमार यांच्या प्रकृती विषयी माहिती दिली आहे.

सायरा बानो म्हणाल्या की, दिलीप  साहेब सध्या खूप थकले आहेत. त्यांची रोग प्रतिकारक शक्ती देखील कमी झाली आहे. दिलीप साहेब यांची मी सध्या देखभाल करते. मात्र, मी त्यांची काळजी त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी घेते.

मी स्वतःचं कौतुक करवून घेण्यासाठी त्यांची काळजी घेत नाही किंवा कौतुकाची अपेक्षा करत नाही. त्यांना स्पर्श करायला मिळनं हीच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. ते माझा श्वास आहेत, असं सायरा बानो यांनी म्हटलं आहे.

तसेच सध्या दिलीप साहेब यांची प्रकृती फार बरी नाही. ते अशक्त आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी सर्वांनी प्रार्थना करा. आमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी आम्ही देवाचे आभारी आहोत, असंही सायरा बानो यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांच्या दोघा भावांना कोरोनाची लागण झाली होती. दिलीप कुमार यांचे भाऊ एहसान खान आणि असलम खान यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता.

यानंतर या दोघांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी दिलीप कुमार यांना देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

लग्नाच्या पाचव्या दिवशीच आदित्य नारायणचा पत्नीसोबतचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पहा व्हिडिओ

मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का! ‘या’ बड्या अभिनेत्रीचं कोरोनामुळे नि.धन

मोठी बातमी! “2020च्या अखेरपर्यंत भारतीयांना लस मिळणार” – आदर पुनावाला

कंगनाने ‘या’ कारणामुळे सुशांत सोबत काम करण्यास दिला होता नकार; वाचा सविस्तर

मुलाखतीतील ‘या’ एका उत्तरामुळे नेहा बॅनर्जी झाली पहिल्याच प्रयत्नात IAS