‘तु माझ्यासाठी सगळं काही आहेस’; ‘या’ अभिनेत्याने शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा रोमॅँटिक फोटो

मुंबई | ‘बिग बॉस ओटीटी’चा भाग असलेल्या झीशान खानने अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अफेअरच्या चर्चांणा पूर्णविराम दिला आहे. झीशानने खुलासा केला आहे की तो त्याच्या कुमकुम भाग्य या मालिकेतील सह-कलाकार रेहाना पंडितसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

झीशानने इंस्टाग्रामवर रोमँटिक नोटसह एक फोटो शेअर करून त्याच्या आणि रेहानाच्या नात्याची कबुली दिली आहे. रेहाना झीशानपेक्षा 11 वर्षांनी मोठी आहे आणि दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.

खुद्द झीशानने एक रोमँटिक फोटो शेअर करून हे नातं स्वीकारलं आहे. या चित्रात दोघेही लिपकीस करताना दिसत आहेत. त्यांच्या या चित्रावर दोघांचे चाहते त्यांच्या शुभेच्छा देत आहेत आणि त्यांच्या प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

माझ्या प्रिय मैत्रिणीपासून माझ्या आयुष्याच्या प्रेमापर्यंत, माझ्या आनंदापासून माझ्या मनःशांतीपर्यंत, मी जे काही मागितले ते तूच आहेस. प्रत्येक सेकंद जो मी तुझ्यासोबत घालवतो, प्रत्येक श्वास मी तुझ्या समोर घेतो… माझे हृदय प्रेमाने भरते, असं झीशानने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मला माहित आहे की असे लोक आहेत ज्यांच्या मनात शंका असेल आणि त्यांना वाटेल की असे प्रेम खरे असू शकत नाही. पण लोकांकडे नसलेल्या गोष्टींवर त्यांचा विश्वास नाही, असं झीशानने पोस्टमध्ये म्हटलंय.

जे जादुई आहे ते एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. तू माझी आहेस आणि मी सर्वांना सांगत आहे की तू माझी आहेस.. मी तुझ्यावर प्रेम करतो, असंही झीशान म्हणाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

अभिनेत्री गहना वसिष्ठच्या ‘या’ बोल्ड फोटोंनी चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मिळणार ‘इतका’ बोनस

काय सांगता! मुंगूस सोडून साप ‘या’ प्राण्यासमोरही पडतो गार, पाहा व्हिडीओ

सोनं घेणाऱ्यांसाठी सुर्वण संधी, वाचा आजचा सोन्याचा दर

ऐटीत सिंहाला गोंजरायला गेला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ