अभिनेत्री दिया मिर्झा होणार आई; फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

मुंबई| बाॅलिवूडमधून आनंदाची बातमी समोर येत आहे. अभिनेत्री दिया मिर्झानं 15 फेब्रुवारीच्या मुहूर्तावर वैभव रेखीसोबत लग्नगाठ बांधली. लग्नाच्या अवघ्या दिड महिन्यातच दिया गरोदर आहे. दियानं ही आनंदाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.

लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच दियाने बेबी बम्पसह फोटो शेअर करत थेट मालदीव्सहून गुड न्यूज दिली. नुकतेच दीयाने सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा तिचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत समर्क अशी कॅप्शनही दिली आहे.

दिया सध्या आपल्या परिवारासोबत मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. तिथलाच एक फोटो तिने शेअर करत ही गुड न्यूज दिली आहे. अंगाई, गोष्टी, गाणी अशा सगळ्या गोष्टींची लवकरच सुरुवात होणार असल्याचं ती कॅप्शनमध्ये म्हणत आहे. माझ्या गर्भात एक सुंदर स्वप्न वाढत आहे अशा आशयाचं कॅप्शन तिने दिलं आहे.

सध्या इंटरनेटवर दिया मिर्झाची चांगलीच चर्चा होत आहे. दियानं आनंदाची बातमी शेअर केल्यापासून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

दिया मिर्झाने ऑक्टोबर 2014 मध्ये तिचा प्रियकर आणि व्यावसायिक भागीदार साहिल संघाशी लग्नगाठ बांधली. साहिल आणि दिया तब्बल पाच वर्ष प्रेमात होते. 2009 मध्ये दिया साहिलला एका कामानिमित्त पहिल्यांदा भेटली होती. भेटीचं रुपांतर मैत्री आणि पुढे प्रेमात झालं. पाच वर्षांच्या संसारानंतर दियाने साहिलसोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दियाने आपल्या घटस्फोटाची घोषणाही सोशल मीडियाच्या माध्यमातूनच 2019 मध्ये केली होती.

2000 साली मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल हा किताब तिला मिळाला. त्यानंतर 2001 मध्ये रहना है तेरे दिल में या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दियाने दम, दीवानापन, तुमको ना भूल पायेंगे, दस, लगे रहो मुन्नाभाई, परिणिता, संजू आदी चित्रपटांत अभिनय केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

महत्वाच्या बातम्या – 

‘चित्रपटात काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’;…

‘माझा दात काढू नका कारण…’;…

“आरोग्याची काळजी घेताना जगण्याची अडचण होऊ नये”

पुण्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता प्रशासनाने घेतला…

मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी…