‘या’ व्हिडीओमुळे अभिनेत्री काजोल देवगण होतीय सोशल मीडियावर ट्रोल, पाहा व्हिडीओ

मुंबई |  सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यातील चाललेल्या घडामोडी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात.

तसेच अभिनेत्री त्यासंबंधीचे फोटो किंवा व्हिडीओही शेअर करत असतात. परंतू अनेकदा त्यांना कोणत्याना कोणत्या कारणावरून सोशल मीडियावर ट्रोल केलं जात.

तसेच बॉलिवूडची सिमरन म्हणजेच काजोल देवगण सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह नसते. परंतू ती आधून-मधून काहीना काही तिच्या चाहत्यांनासाठी फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने एक व्हिडीओ आपल्या इंस्टग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे.

परंतू काजोलने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. काजोलने शेअर केलेला व्हिडीओ फक्त 5 सेकंदाचा आहे. परंतू या व्हिडीओतील तिच्या कृत्यामुळे नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. तसेच तिचे चाहतेही तिच्यावर नाराज झाले आहेत.

या व्हिडीओमध्ये काजोल एक फळ कापत आहे. काजोलच्या हातात एक सफरचंद असल्याचं दिसतं आहे.  सुरूवातीला ती ते सफरचंद वर हवेत उडवते आणि तिच्या हातात असलेल्या चाकूने ते जोरात कापते. हा व्हिडीओ स्लोमोशनमध्ये असल्यामुळे सर्व हालचाली स्पष्ट आणि साफ दिसून येत आहेत.

या व्हिडीओवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही नेटकरी म्हणत आहे की,असं अन्न वाया घालवू नको,सध्या परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. करोना महामारीमुळे सर्वांचं मोठं नुकसान झालं आहे. लोक अन्नासाठी मरत आहेत.

तसेच हा व्हिडीओ पोस्ट करताना काजोलने ‘मूड’ असं कॅप्शनही दिलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळजवळ अडीच लाख लोकांनी लाईक केलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपियाला तिच्या एका पोस्टवर एका यूजरने अतिशय विचित्र कमेंट केली होती. त्यावर तिने त्या यूजरला चांगलेच खडेबोल सुनावले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

म्हत्वाच्या बातम्या-

कोरोना काळातील अनोख्या पद्धतीचं लग्न पाहिलत का?, नसेल तर…

तरूण आपल्या शरिराची ज्याप्रकारे घडी करतोय ते पाहून तुम्हीही…

IPL 2021: रंगतदार सामन्यात आरसीबीचा दिल्लीवर अवघ्या 1 धावेने…

‘नेत्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का?’ केदार…

‘तुमच्यासारखी मानसिकता असल्यामुळे स्त्रियांवर बलात्कार…