आता शिल्पा शेट्टी कुंद्रा घेवून येत आहे टिक टॉकसाठी ‘हा’ पर्यायी अॅप

मुंबई | कोरोना व्हायरसचा उगम चीनच्या वुहान शहरामध्ये झाला. यानंतर जगभरात कोरोनाने थैमान घातले. त्याचा परिणाम आता चीनी प्रोडक्ट्सवर होताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर चीनने बनवलेळे ॲपसुद्धा बॅन करण्याच्या मागण्या होत आहेत.

भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टिकटॉकवर बंदी आणण्याची मागणी काही दिवसांपूर्वी होत होती. यामुळे भारत सरकारने टिक टॉकवर बंदी घालत आता टिकटॉकला पर्याय म्हणून मित्रो ॲप लाँच केला आहे.

नुकतेच मित्रो अॅप नेटिझन्सच्या भेटीला आला असून कमी कालावधीमध्ये त्याने जास्त युजर्स मिळवले आहेत. साधारण दोन ते तीन महिन्यापूर्वी भारताने टिकटॉक, पबजी, यासारख्या 100 हून अधिक चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यानंतर बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने पबजी प्रेमींसाठी पर्याय म्हणून भारतीय ‘फौ-जी’ अॅप लवकरच भेटीला येत असल्याचं सांगितलं.

आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा आणि तिचा पती राज कुंद्रा हे देखील टिकटॉकला टक्कर देणाऱ्या भारतीय लाईव्ह स्ट्रीमिंग अ‍ॅपची निर्मिती करत असल्याचे कळत आहे.

चीनमध्ये टिक टॉक हे अ‍ॅप ‘डॉयइन’ नावाने प्रसिद्ध आहे. सप्टेंबर 2016 साली चीनने ‘डॉयइन’ या अ‍ॅपला चीनच्या ऑनलाईन मार्केटमध्ये लाँच केले होते. यानंतर वर्षभरात ‘टिक टॉक’ या नावाने हे अ‍ॅप जगभरात लाँच झाले होते. जगभरात या अ‍ॅपचे सुमारे 500 मिलियन अर्थात 50 कोटीपेक्षा जास्त युजर्स होते.

अशातच आता स्वतः राज कुंद्रा यांनी नवीन अॅपविषयी माहिती देत चीनी अॅप्सवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, जेएल स्ट्रीम हे अनेक वैशिष्ट्यांसह बनविलेले भारतीय लाईव्ह स्ट्रीमिंग अ‍ॅप आहे. काही चिनी अ‍ॅप्स भारतात बंदी असूनही सर्व्हर सुरू ठेवून आणि मिकोचे मिका असे नाव बदल करून सर्रास भारतात वापरले जात आहेत.

चीनी अ‍ॅप्सवर बंदी असल्याने ते हाँगकाँगचे असल्याचा दावा करतात. अशा अपराधींना शिक्षा झाली पाहिजे. भारतीयांनी अशा अ‍ॅप्सना प्रोत्साहन न देता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असंही राज कुंद्रा यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

…म्हणून ऐश्वर्याने अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला; वाचा ऐश्वर्याचा बालपण ते सुप्रसिद्ध अभिनेत्री पर्यंतचा प्रवास

‘त्या’ प्रकरणी न्यायालयाची मोठी सुनावणी; गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह 17 जणांना न्यायालयानं…

राज्यपाल एकनाथ खडसे यांचा आमदारकीचा अर्ज नाकारणार?

अखेर सलमान खान विवाह बंधनात अडकला! पाहा कोण आहे सलमानची पत्नी?

सुशांत प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट! आता अंकिता लोखंडेवरच ‘या’ प्रकरणी कारवाई होणार?