जनतेचा आवाज सरकारने ऐकावा…- आदित्य ठाकरे

मुंबई |  मुंबईत आरेवरून चांगलंच राजरकारण तापलं आहे. आमचा विरोध फक्त 2700 झाडांबद्दल नाहीये तर बायो- डायव्हर्सिटीचा हा प्रश्न आहे. लोकांचा जो आवाज आहे तो सरकारने ऐकावा, MMRCL ने ऐकावा, असं आवाहन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

मुंबईसाठी आम्ही सर्व बसलेले आहोत. मेट्रो आम्हाला सगळ्यांना हवी आहे. पण ही जी काही दादागिरी चालू आहे, मनमानी सुरू आहे, सगळं काही आम्ही सहन केलेलं आहे. पण मुंबईत आरेला हात लावला तर आम्ही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

शिवसेनेचा मेट्रोला विरोध नसून आरे कारशेडमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कारशेडला विरोध आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

कांजूरमार्गची जागा मेट्रो 6 साठी चालत असेल तर मेट्रो 3 साठी का चालत नाही? असंही त्यांनी सरकारला विचारलं.

दरम्यान, आम्ही फक्त विरोधाला विरोध करत नाही असं सांगत तांत्रिक मुद्द्यांवर फक्त चर्चा होत असून वस्तुस्थितीबद्दल कोणीही बोलत नाही, अशीही खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

महत्वाच्या बातम्या-