कौतुकास्पद! 9 वर्षाच्या ‘या’ चिमुकलीनं देश कोरोनामुक्त होण्यासाठी ठेवले पुर्ण रोजे

बुलढाणा| देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून पेशंटची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. अशा संकट काळात अनेक लोक पुढे येत सढळ हातानं मदत करत आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं अक्षरशः तांडवच बघायला मिळत आहे. देशाच्या विविध भागात कोरोनाने हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे.

अशातच कोरोना संकटाच्या काळात पवित्र रमजान महिना सुरु आहे. कोरोना महामारीने जगातील जनता त्रस्त झाली आहे. जग व भारत देश कोरोनामुक्त व्हावे अशी प्रार्थना अल्लाकडे करत बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील 9 वर्षाच्या अबीरा फहिम देशमुख या चिमुकलीने रमजान महीन्याचे सर्व रोजे ठेवले आहेत.

शेगाव येथील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या अबीरा देशमुख हिने सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात रोजाच्या नियमांनुसार दिवसभर अन्न व पाणी न घेता उपाशी पोटी राहून अल्लाहच्या प्रति श्रद्धा व्यक्त केली.

या कडक उपवासात देशात व जगात पहील्यासारखे जनजीवन सुरू व्हावे, कोरोनाबाधितांची प्रकृती बरी व्हावी, देश या कोरोना संकटातून बाहेर पडावा अशी विशेष प्रार्थना अल्लाहकडे दररोज ही चिमुकली रोजा इफ्तार करताना कुटुंबीयांसोबत करत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लोकांच्या हालअपेष्ठा पाहाता, लोकांची सेवा करण्यासाठी अबीराने आपल्याला डॉक्टरच व्हायचंय असा निश्चय केला आहे.

दरम्यान, संपुर्ण देश सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी लढत आहे. त्यातच काही राज्यांमध्ये तर कोरोनाने हाहाकार केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही नंबर लागतो. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही.

मागील वर्षापासून आपण कोरोनासोबत जगत आहोत, त्याला संपवण्यासाठी लढत आहोत. कोरोनाच्या दुस-या लाटेने तर मृत्युचे तांडवच चालवले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

स्वामींचा धावा करत अंकिता लोखंडेनं घेतला कोरोना लसीचा पहिला…

कौतुकास्पद! …..म्हणून वृद्ध महिलेने आपल्या जीवाची…

…..म्हणून ‘हिंदुस्थानी भाऊ’ला पोलिसांनी…

कंगना रणौतला कोरोनाची लागण, हिमाचलच्या घरी जाण्याची करत होती…

धमकी देत विवाहितेवर केला बलात्कार, कारण ऐकून तुम्हालाही बसेल…