कौतुकास्पद! ‘या’ अभिनेत्रीनं घेतली कचरापेटीत सापडलेल्या मुलीची जबाबदारी

मुंबई| अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मी़डियावर चांगलीच सक्रिय असून तिचे फॅन्स तिला सोशल मीडियावर मोठ्या संख्येने फॉलो करतात. पण आता एका कारणामुळे स्वरा भास्करचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे.

अभिनेत्री स्वरा भास्कर ही आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. अनेकदा यामुळं तिला ट्रोल देखील केलं जातं. मात्र यावेळी स्वरानं केलेल्या एका कृतीसाठी सर्वजण तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

स्वराने कचरापेटीमध्ये सापडलेल्या एका मुलीला दत्तक घेतलं आहे. या मुलीसोबतचे फोटो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे सध्या स्वरा चर्चेचा विषय ठरत आहे.

स्वरा नुकतीच तिच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने उत्तर प्रदेश येथील बदायुला गेली होती. त्यावेळी तिने तेथील एका अनाथाश्रमाला भेट दिली होती. तिथल्या अनाथाश्रमाला एखादी मदत करावी या हेतूने ती तिथे गेली होती. पण तिथे गेल्यानंतर एका लहान मुलीची कथा ऐकून तिला प्रचंड वाईट वाटले.

ही चिमुकली मुलगी त्या अनाथआश्रमाच्या संचालिका प्रियांका जौहरी यांना एका कचऱ्याच्या डब्यात सापडली होती. तिची ही गोष्ट ऐकून स्वराला आपले अश्रू आवरले नाही आणि तिने या मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. स्वराने या मुलीला दत्तक घेतले असले तरी ही मुलगी काही काळासाठी त्या अनाथाश्रमामध्येच राहाणार आहे. तिचा पालनपोषणाचा. शिक्षणाचा सगळा खर्च स्वरा उचलणार आहे. ही मुलगी मोठी झाल्यानंतर स्वरा तिला आपल्या घरी घेऊन जाणार आहे.

संचालिका प्रियांका यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वराला लहान मुलं सांभाळण्याचा अनुभव नाही. शिवाय सध्या सर्वत्र कोरोनाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत अनुभव नसलेली व्यक्ती काही महिन्यांच्या मुलीचा सांभाळ करु शकेल का याबाबत सर्वांनाच शंका होती. त्यामुळं स्वरानं या मुलीला आणखी काही काळ या आश्रमातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वरानं या आश्रमातील सर्व मुलांच्या शिक्षणासाठी काही आर्थिक मदत देखील केली आहे. तिचे या मुलीसोबतचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. हे फोटो पाहून स्वरावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, स्वरा भास्कर शेवट नेटफ्लिक्सचा कॉमेडी वेब शो ‘भाग बीनी भाग’मध्ये दिसली होती. या शोमध्ये स्वराने स्टँड अप कॉमेडियनची भूमिका केली होती. आता स्वरा ‘शीर कोरमा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात स्वरासोबत अभिनेत्री दिव्या दत्ता मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एलजीबीटीक्यूआयएवर आधारित असणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

ज्या ड्रेसमुळे ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा ट्रोल…

मौनी रॉयच्या ‘या’ लूकने चाहते घायाळ, पाहा…

करीना कपूरला झोपताना हव्या असतात ‘या’ तीन…

कोरोनावर मात केल्यानंतर आलिया भट म्हणाली…

IPL 2021: 6 बाॅलमध्ये बदललं मॅचचं चित्र, चुरसीच्या लढतीत…