दिल्लीत मानहानीकारक पराभव झाल्यानंतर भाजपचं एक पाऊल मागे

नवी दिल्ली |  दिल्लीत भारतीय जनता पक्षाला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भाजपने एक पाऊल मागे घेत आता प्रादेशिक पक्षांक्षी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात आहे. दिल्लीत निवडणूक निकालानंतर भाजपविरोधी पक्ष केजरीवालांच्या नेतृत्वात एकटवण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र हीच शक्यता नाहीशी करण्यासाठी भाजप प्रादेशिक पक्षांक्षी संपर्क साधणार आहे, अशी माहिती कळतीये.

दिल्लीत झालेल्या पराभवानंतर प्रादेशिक पक्षांची मदत घेणे आम्हाला अपरिहार्य झालं आहे. मग तो पक्ष सत्तेत असो वा विरोधात… आमचं प्रमुख लक्ष भाजपविरोधी गट एकत्र येण्यापासून रोखणं हेच असल्याचं भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची भेट घेत सुमारे दीड तास चर्चा केली. यावरून आगामी काळात वायएसआर काँग्रेसला एनडीएमध्ये सामिल करण्याच्या भाजपच्या हालचाली वाढल्या आहेत.

दुसरीकडे राज्यसभेत महत्त्वपूर्ण कायदे संमत करून घेण्यासाठी प्रादेशिक पक्षांची गरज भासणार आहे. त्याच दृष्टीने भाजपने पावलं टाकायला सुरूवात केल्याचं दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-शाळांमधून सावरकरांचे फोटो काढण्याचे राज्य सरकारचे आदेश; राजकीय वादाला फुटलं तोंड

-मनसैनिकांनो आमचं उष्ट कशाला खाताय?- गुलाबराव पाटील

-“सावरकरांनी देशाची अतूट सेवा केली अन् काँग्रेस त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करतंय”

-क्षणिक आणि आभासी सुखाच्या मागे धावू नका; राजू शेट्टींचा शेतकरी मुलींना सल्ला

-पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय म्हणजे सरकारचा मुर्खपणा; काँग्रेस नेत्याचं टीकास्त्र