एकनाथ खडसेंच्या आरोपानंतर 1100 कोटींच्या ‘त्या’ घोटाळ्यावर गिरीश महाजन म्हणाले…

मुंबई | राज्य सरकार आणि विरोधी पक्षातील नेते सतत कोणत्या न कोणत्या कारणांवरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीतील नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्यांवर आरोप करताना भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी बँकेतील 1100 कोटीचं घोटाळा प्रकरण उघड करण्याचा इशारा दिला होता.

एकनाथ खडसे यांच्या या इशाऱ्यानंतर प्रथमंच भाजप नेते गिरीश महाजन यांनी मौन सोडत खडसे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. गिरीश महाजन हे जळगाव मधील एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक आहेत. आज मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी खडसेंना उत्तर दिलं आहे.

खडसेंनी केलेल्या आरोपावर स्पष्टीकरण देताना महाजन म्हणाले की, बीएचआर घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही. सुनील झंवर हा माझा खूप आधी पासूनचा मित्र आहे. त्यामुळे मला जाणीवपूर्वक लक्ष केलं जात आहे.

बीएचआर घोटाळ्यात माझ्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेल्यास योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. तसेच कोणाच्या पतसंस्थेमध्ये घोटाळा झाला आहे याची देखील चौकशी झाली पाहिजे. माझ्यावर फक्त राजकीय कारणासाठी आरोप करण्यात येत आहेत. याप्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सत्यस्थिती सर्वांसमोर येईल, असं देखील महाजन यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी आज सुप्रिया सुळेंना राज्यापेक्षा राष्ट्रीय राजकारणात रस असल्याचं म्हटलं होतं. याविषयी देखील महाजन यांना मुलाखती दरम्यान प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, यावेळी गिरीश महाजन यांनी या प्रश्नावर जास्त बोलणं टाळलं. गिरीश महाजन म्हटले की, कोणाला काय पद द्यावं? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं जात होतं. मात्र, या गोष्टीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सफाईदारपणे उत्तर दिलं आहे.

येत्या १२ डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचं औचित्य साधून लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार यांनी त्याचं उत्तर दिलं आहे.

माझ्या माहितीप्रमाणे सुप्रिया सुळे यांना राज्याच्या राजकारणात रस नाही. त्यांचा रस देशाच्या राजकारणात आहे. त्यांना काही दिवसांपूर्वीच संसदरत्न पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे. प्रत्येकाचा एक इंटरेस्ट असतो यामुळे सुप्रिया सुळे यांचा इंटरेस्ट राज्यातील राजकारणात नसून राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात आहे, असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टाटा, ह्युंदाई आणि महिंद्राला जोरदार टक्कर; अवघ्या 4 लाखात मिळणार ‘ही’ SUV

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे होणार? शरद पवार म्हणाले…

1500 रुपये घेऊन भारतात आले, टांगा चालवला आणि उभं केलं अरबोंचं साम्राज्य

रुपाली चाकणकरांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात; ‘हे’ आहे कारण!

राष्ट्रवादीचं नेतृत्त्व कुणाकडे जाणार?; शरद पवारांची ‘या’ नावांना पसंती