“शिवथाळीच्या यशानंतर ‘शिव दवाखाने येणार, डाॅक्टरांच्या ऐवजी कंपाउंडर असणार”

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत ‘डॉक्टरांना काय कळतंय, मी नेहमी कंपाऊंडरकडून औषधं घेतो, असं वक्तव्य केलं होतं. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. याच मुद्द्यावरून आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

शिववडापाव आणि थाळीच्या घवघवीत यशानंतर आता येत आहेत शिवदवाखाने… इथे डॉक्टरांच्या ऐवजी कंपाऊंडर असतील, अशा शब्दात भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे अनेक डॉक्टरांनी संताप व्यक्त केला आहे. राऊत यांच्या या वक्तव्यासाठी त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे शाखेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, संजय राऊत आपल्या विधानावर ठाम आहेत. माझं विधान जागतिक आरोग्य संघटनेबद्दल होतं. मी डॉक्टरांचा अपमान होईल असं काहीही बोललो नाही, असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“राज्यात ‘या’ 20 आजारांवर मोफत उपचार, फी आकारल्यास ….”; गणपतीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अशोक चव्हाणांवर दिली ‘ही’ महत्वाची जबाबदारी

2019च्या त्या रात्री मी सुशांतच्या बेडवर झोपले होते अचानक…; रियाने केला धक्कादायक खुलासा!

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह

बॉलीवूड क्वीन कंगनाला का वाटू लागलीय भीती? कंगना सोशल मीडियावर झाली व्यक्त