“अहो, आम्ही पण हिंदूच आहोत, कदाचित तुमच्यापेक्षा जास्त…”

मुंबई | सध्या देशात सुरू असलेल्या हिंदूत्ववादी राजकारणामुळे राज्यात आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर होत आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेला राष्ट्रवादीने जोरदार विरोध केला आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे अयोध्येला जात आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशमधील मशिदीवरील भोंगे बंद आहेत का? हे तपासावे. राज ठाकरेंनी एखाद्या मशिदीच्या बाजूला बसून तिथले भोंगे किती वेळ चालतात, हे बघावे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

गुजरात आणि मध्य प्रदेश तसेच भाजपशासित इतर राज्यात जाऊनही भोंगे सुरु आहेत का बघावं. तिथं भोंगे बंद केलेले नसतील तर महाराष्ट्रात तसा आग्रह धरण्याचा कुठलाही नैतिक अधिकार भाजपला राज ठाकरेंच्या मागे दडून आहे, असं मला वाटत नाही, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांचा नक्की कार्यक्रम मला माहिती नाही.पण राज ठाकरेंनी भाजपचे बाहुले बनून काम करण्यास सुरूवात केलेली आहे. त्यांची सुसज्ज अशी व्यवस्था योगी साहेबांनी केलेली दिसते, असेही पाटील म्हणाले आहेत.

मी माझ्या घरी गणपती बसवतो, हे वृत्तवाहिन्यांवर अनेकदा दाखविण्यात आलेले आहे. आमच्या पक्षातले अनेक नेते देवधर्म करतात, त्यावेळी त्याचे प्रदर्शन होतेच. मात्र, आम्ही मतं मागायला लोकांपुढे जात असताना धर्माची भूमिका घेऊन जात नाही, असा टोला देखील पाटलांनी यावेळी लगावला आहे.

आम्ही हिंदू आहोतच. कदाचित त्यांच्यापेक्षा आमच्या घरात जास्त कडक पद्धतीने हिंदू धर्म पाळला जात असेल. पण याचा अर्थ आम्ही आमचे हिंदुत्व घेऊन रस्त्यावर फिरावे आणि दुसऱ्या धर्माचा द्वेष सुरु करावा, अशी आमची भूमिका नाही, अशी टीका देखील जयंत पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, फोन टॅपिंगच्या घटना मागील भाजप सरकारच्या काळात फार मोठ्या प्रमाणात झाल्या, अशी माहिती समोर आली. त्याची चौकशी सुरू आहे. काही अधिकाऱ्यांनी फोन टॅपिंगमध्ये कसा सहभाग घेतला, याचीही चौकशी सुरू आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या अधिकाऱ्यांना फोन टॅपिंग करायला कुणी सांगितले?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.

महत्वाच्या बातम्या- 

कीर्तनकार सेक्स व्हिडीओ प्रकरणात अखेर पोलिसांची मोठी कारवाई!

IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! सामना सुरू होण्याआधीच वाईट बातमी आली

राज्यात पुन्हा निर्बंध लागणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य

“होय, मी मान्य करतो”, अखेर गुणरत्न सदावर्तेंची कोर्टात कबुली

राज ठाकरे नव्हे ‘खाज’ ठाकरे; अमोल मिटकरींनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली