“पंतप्रधान मोदींचे अपशकुनी पाय इस्त्रोमध्ये लागल्यानेच संशोधकांसाठी दुर्भाग्य”

बंगळूरू : भारतासाठी महत्वाकांक्षी असणाऱ्या ‘चंद्रयान 2’ चे विक्रम लॅडर चंद्रावर उतरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रोच्या कार्यालयात असल्याने अपशकून झाला, असं म्हणत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

मोदींचे अपशकुनी पाय इस्त्रोमध्ये लागल्याने संशोधकांसाठी दुर्भाग्य ठरलं, असं वक्तव्य कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केलं आहे.

जसं काय मीच चंद्रावर लॅण्ड करणार आहे, असा संदेश देण्यासाठी पंतप्रधान मोदी बंगळुरूला आले होते. या मोहिमेसाठी संशोधकांनी तब्बल 10 ते 12 वर्ष कठोर मेहनत केली. मोदी फक्त प्रचाराच्या दृष्टीने आले होते. त्यांनी इस्रोमध्ये पाय ठेवला आणि तो क्षण संशोधकांसाठी दुर्भाग्याचा ठरला, असं कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे.

भारतीय चांद्रयान-2 चे विक्रम हे लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटर असताना त्याचा संपर्क तुटला. त्यामुळे लँडरची दिशा आणि ठिकाण कळण्यात संशोधकांना अडचणी निर्माण झाल्या. विक्रमसोबतचा संपर्क तुटल्यानं इस्रोसह देश निराश झाला, असंही कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे.

लँडरशी संपर्क तुटल्यानं मोहिमेला 5 टक्के धक्का बसला आहे. यामुळं चंद्राच्या पृष्ठभूमीची माहिती मिळणार नाही. मात्र 95 टक्के काम सुरू राहणार आहे. ऑर्बिटरच्या सहाय्यानं इतर माहिती मिळत राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या-