“नोटाबंदीवेळी हवाई दलाने 625 टन नव्या नोटा पोहोचविल्या”

मुंबई | 2016 साली केंद्र सरकारनं घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर देशात खळबळ उडाली होती. मात्र हवाई दलाने नोटाबंदीनंतर देशातील विविध भागात 625 टन नवीन नोटा पोहोचविण्याचं काम केल्याची माहिती माजी एअर मार्शल बी.एस.धनोवा यांनी दिली आहे. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मुंबई येथील आयोजित टेकफेस्ट कार्यक्रमावेळी ते बोलत होतेे.

ज्यावेळी नोटाबंदी झाली होती. तेव्हा आपल्यापर्यंत नव्या नोटा पोहोचविण्याचं काम केलं होतं. जर 20 किलोग्रॅमच्या बॅगेत एक कोटी रुपये येतात. तर मी सांगू शकत नाही की किती कोटी रुपये आम्ही पोहोचवले असतील, असं बी.एस.धनोवा यांनी म्हटलं आहे.

नोटाबंदीच्या घोषणेनंतर देशाच्या सेवेसाठी हवाई दलाने 33 मोहिमांद्वारे 625 टन नोटा विविध भागात पोहोचविल्या असल्याचं बी.एस.धनोवा यांनी प्रेझेंटेशनच्या एका स्लाइडमध्ये दाखवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर, 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, बी.एस.धनोवा हे 31 डिसेंबर 2016 पासून 30 सप्टेंबर 2019 पर्यंत हवाई दलाचे प्रमुख होते. कार्यक्रमावेळी बी.एस.धनोवा यांनी राफेल खरेदीवरील वाद-विवादावरही भाष्य केलं.

महत्वाच्या बातम्या-