बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि तिचा पती अभिषेक बच्चन (Abhisekh Bachchan) यांच्या नात्यात तणाव असल्याच्या बातम्या सातत्याने वाचायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. या प्रकरणात रोज नवनवीन अपडेट येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनूसार ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) यांचं अजिबात पटत नाही. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यात फूट पडायला हे मुख्य कारण असल्याचं कळतंय. आता या प्रकरणातील नवीन माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
जया बच्चन कुणाला उद्देशून म्हणाल्या-
ऐश्वर्याची (Aishwarya Rai) सासू जया बच्चन यांनी नुकतंच केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आले आहे. एका फिल्म फेस्टिवलमध्ये बोलताना जया बच्चन यांनी इंटिमेट सीनबाबत मोठं भाष्य केलं आहे. तसेच आजच्या अनेक सिनेमांवर नाराजी व्यक्त करत संतापही व्यक्त केला आहे. जया बच्चन यांच्या या वक्तव्याची आता एकच चर्चा रंगू लागली आहे, कारण त्यांनी ऐश्वर्याला उद्देशूनचं हे वाक्य उच्चारल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे.
इंटिमेट सीन करताना काहींना लाज..- जया बच्चन
अभिनेता रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय यांनी ‘ए दिल हे मुश्किल’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. यात अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील मुख्य भूमिकेत दिसली होती. रणबीर कपूर आणि ऐश्वर्याने या सिनेमात अनेक इंटिमेट सीन देखील दिले होते. जया बच्चन यांच्या या वक्तव्यामागे याच सिनेमाची पार्श्वभूमी असल्याचं म्हटलं जात आहे.
ऐश्वर्याचा हा सिनेमा तेव्हा जया बच्चन (Jaya Bachchan) यांना अजिबात आवडला नव्हता. त्यांनी याबाबत नाराजी देखील व्यक्त केली होती. आता नुकतेच त्यांनी याबाबत बोलून दाखवले आहे, त्यामुळे या विषयाची आता नव्याने चर्चा होऊ लागली आहे.
“आताच्या सिनेमात लाज नावाची गोष्टच राहिलेली नाहीये. सध्या लोक सिनेमे फक्त आणि फक्त पैशांसाठीच करतात. त्यातच इंटिमेट सीन करताना काहींना लाज सुद्धा वाटत नाही.(हे वाक्य ऐश्वर्यासाठी असल्याचं मानलं जातंय) त्यामुळे आताच्या सिनेमाचं गांभीर्य नष्ट होत चाललं आहे. सर्वांसमोर प्रेमाचं प्रदर्शन केलं जात आहे.”, असं जया बच्चन जाहीरपणे म्हणाल्या आहेत. त्या 18 व्या मुंबई फिल्म फेस्टिवलमध्ये (Jio MAMI Mumbai Film Festival 2023) बोलत होत्या.
जया बच्चन यांच्या विधानाने खळबळ-
जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी ऐश्वर्या रायचे नाव घेतले नाही, मात्र, तीने ‘ए दिल हे मुश्किल’ मध्ये इंटिमेट सीन दिल्यामुळे जया बच्चन यांनी यावरच संताप व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा असताना या विधानाने या विषयावर अजूनच तेल ओतलं आहे. सोशल मीडियावर चाहते देखील आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
ऐश्वर्याने ‘ए दिल हे मुश्किल’ मध्ये साकारलेल्या भुमिकेमुळे बच्चन कुटुंबात (Bachchan Family) प्रचंड नाराजी होती, असं अनेकदा म्हटलं गेलं आहे. सध्या ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत. अशात जया बच्चन यांनी विधान केल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र, या सर्व चर्चेवर बच्चन कुटुंबियांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यामुळे हा विषय अधिकच वाढत चालला आहे.
News Title: Aishwarya rai Jaya bachchan controversy
महत्त्वाच्या बातम्या-
Bollywood News | बॉलिवूडमध्ये एकच कुजबूज, ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री प्रेग्नंट असल्याची जोरदार चर्चा