पार्किंगच्या वादातून अभिनेता अजय देवगनला मारहाण? व्हिडीओ व्हायरल

मुंबई | सध्या सोशल मीडियावर अजय देवगनचा एक कथित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी चालल्याचं दिसत आहे. या मारहाणीत अजय देवगणचं नाव जोडलं जात आहे. मात्र, व्हिडिओतील व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्यानं हा व्यक्ती नेमका कोण आहे? हे ओळखणं कठीण आहे.

कार पार्किंगवरुन अजय देवगणचं कर्मचाऱ्यांशी भांडण झालं आणि त्यानंतर हे भांडण मारहाणीपर्यंत गेलं, असा दावा या व्हिडीओबाबत केला जात आहे. तसेच ही घटना दिल्लीत घडली असल्याचं बोललं जात आहे.

मात्र, या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती अजय देवगण नसल्याचं त्याच्या टिमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा देखील अजय देवगणच्या टीमने केला आहे.

यासंबंधीत एक स्टेटमेंट जारी करत अजयच्या टीमने लिहिलं आहे की, अजय देवगनच्या नावाने व्हायरल होणारा व्हिडीओ खोटा आहे. आम्ही प्रसार माध्यमांना विनंती करतो की त्यांनी यावर विश्वास ठेवू नये. अजय देवगण पाठीमागच्या कित्येक दिवसांपासून मुंबईतच आहे.

आगामी चित्रपट मैदान, गंगुबाई काठियावाडी आणि मेडे याच्या शूटिंगमध्ये तो व्यस्त आहे. मागील 14 महिन्यांपासून तो दिल्लीला गेलाच नाही. जानेवारी 2020 मध्ये ‘तान्हाजी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो शेवटचा दिल्लीला गेला होता.

तसेच या स्टेटमेंटमध्ये पुढे लिहिलं आहे की, अजय देवगण नेहमीच जबाबदारीनं आणि सामाजिक शिष्टाचारांचं भान ठेवून वागतो. यात दिसणारी व्यक्ती अजय देवगण नाही. त्यामुळे अशाप्रकारचं कोणतंही वृत्त प्रकाशित करण्याआधी सत्य परिस्थिती समजून घ्या.

दरम्यान, हा व्हिडीओ खरा की खोटं हे समजणं सध्या तरी अवघड आहे. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोक अजय देवगणवर टीका करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“वाझेंनी असा कोणता खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलं”

राज्यात लॉकडाऊन होणार का?, राजेश टोपे म्हणाले…

आज सोनं ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त, जाणून…

लॉकडाऊनबाबत नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना दिला…

‘अन्यथा रुग्णालये ताब्यात घेणार’; ठाकरे सरकारचा…