जेएनयू प्रकरणी आगीत तेल ओतण्याचं काम करु नका; अजय देवगणचा सल्ला

नवी दिल्ली | दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात काही बुरखाधारी गुडांनी घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. या घटनेची संतप्त प्रतिक्रिया देशभरात उमटत आहे. या पार्श्वभूमीवर बाॅलिवूडमधील अभिनेता अजय देवगण याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

जेएनयूमध्ये घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी असल्याचं तो म्हणाला आहे. तसेच अद्यापही कोणी काय केलं याबाबतची स्पष्ट माहिती आपल्याला मिळू शकलेली नाही. त्यामुळे योग्य माहिती नसेल तर आगीत तेल ओतण्याचं काम करु नका, असा सल्ला देवगणनं दिला आहे.

प्रसारमाध्यमांतून येणाऱ्या विविध बातम्यांमधून कॅम्पसमध्ये नेमकं काय घडतंय याची माहिती नाही. त्यामुळे याच्यावर मत व्यक्त करणं योग्य नाही. मात्र, विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला हा दुर्दैवी असल्याचं तो म्हणाला आहे.

एक कलाकार म्हणून आपल्यावर काही जबाबदारी असते. त्यात काही वक्तव्य करुन गोंधळ निर्माण करण्याची माझी इच्छा नाही. एका कलाकाराने पूर्ण माहिती घेऊनच भाष्य करावं, असं देवगण म्हणाला आहे.

महत्वाच्या बातम्या-