“तृप्ती देसाई इंदोरीकर महाराजांविरोधात गेलात तर…”

मुंबई | तृप्ती देसाई जर इंदोरीकर महाराजांच्याविरूद्ध गेल्या तर त्यांचं तोंड काळं करू, असा इशारा महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांनी दिला आहे.

तृप्ती देसाई जर इंदोरीकर महाराजांच्याविरुद्ध गेल्या तर त्यांचं तोंड काळं करु. तृप्ती देसाई ही ख्रिश्चन धर्माची आहे तिने हिंदू धर्मात लुडबुड करु नये, असं अजय सिंह सेंगर यांनी म्हटलं आहे.

इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. मात्र या वक्तव्याचे काही लोक समर्थन तर काही लोक विरोध करत आहेत.

दरम्यान, गुन्हा दाखल न झाल्यास इंदोरीकर महाराजांच्या तोंडाला काळं फासू, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला होता. यालाच अजय सिंह सेंगर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-मुख्यमंत्रीसाहेब, डोंबिवलीत भोपाळ होण्याची वाट बघताय का?- राजू पाटील

-महाराज काळजी करू नका सर्व पैलवान तुमच्या मागे ठाम उभे आहेत- हर्षवर्धन सदगीर

-इंदोरीकरांविरोधात गेल्या तर तोंड काळं करू; करणी सेनेचा तृप्ती देसाई यांना इशारा

गुंडांचं आत्मबल वाढवणारं ‘पालकत्व’ बीडला मिळालं हे आमचं दुर्दैव; पंकजांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

-एकेकाळी बसस्टॉपवर रात्र काढणाऱ्या निलेश साबळेने मुंबईत घेतलं स्वत:चं घर!