अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये रंगला बॅडमिंटन सामना; विखेंचीही उपस्थिती

नाशिक | नाशिक दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात संध्याकाळी शासकीय विश्रामगृहावर बॅडमिंटन सामना पाहायला मिळाला.  विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा उपस्थित होते.

अजित पवार यांनी आज विविध जिल्ह्यांच्या विकासकामांचा आढावा घेतला. अजित पवारांनी आज भल्या सकाळी कामाला सुरुवात केली होती. कामकाज आटोपल्यानंतर संध्याकाळी शासकीय विश्रामगृहावर अजित पवार आणि छगन भुजबळांनी बॅडमिंटनवर हात आजमावला.

अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील एका कोर्टमध्ये तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ असा सामना काहीवेळ रंगला. आधी अजित पवार आणि छगन भुजबळ हे बॅडमिंटन खेळले, त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याही हातात रॅकेट देण्यात आलं.

दरम्यान, राजकीय क्षेत्रातील या तिन्ही नेत्यांना एकत्र खेळताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या- 

-मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला ठाकरे सरकारकडून पूर्णविराम?

-प्रेमी युगलाला मारहाण करणारे सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात

-विरोधकांना गाडण्यात माझी पी. एचडी; म्हणूनच पक्षानं मला दिल्लीत बोलावलं- पंकजा मुंडे

-निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांच्या फाशीला स्थगिती

-प्रेमी युगलाला मारहाणीची घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी; सुप्रिया सुळे संतापल्या