“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यंदा डिजिटल माध्यमातून साजरी करा”

मुंबई | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाच्या संकटामुळे बाबासाहेबांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

अजित पवार यांनी बाबासाहेबांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना विनम्र अभिवादन केलंय. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा संदेश पाठवला आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदारमतवादी विचारांचे, मानवतावादी शिकवणींचे पालन करुन देशहितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण उद्या घरातच थांबून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करुया. त्यांना अभिवादन करुया, असं अजित पवार म्हणाले आहेत.

कोरोनाविरुद्धची लढाई आता गंभीर वळणावर आली असून 30 एप्रिलपर्यंत वाढवलेली टाळेबंदी आपल्या सर्वांचा जीव वाचवण्यासाठीच आहे. सरकारच्या या निर्णयाचा आदर राखून सर्वांनी घरातच रहा, सुरक्षित रहा, असंही अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

-MPSC-UPSC विद्यार्थ्यांना दिलासा; यंदा वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना आणखी 1 वर्ष संधी मिळणार?

-‘या’ दोन राज्यात सोमवारपासून मद्य विक्री सुरू होणार!

-‘कोरोना’च्या संशयातून शेजाऱ्यांनी मदत नाकारली; हार्ट अटॅक आलेल्या वृद्धाने प्राण सोडले

-अभिनेत्री पूनम पांडेचा न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

-नरेंद्र मोदी उद्या करणार महत्त्वाची घोषणा; सकाळी 10 वाजता देशवासीयांशी साधणार संवाद