“धार्मिक कार्यक्रमांसाठी घराबाहेर पडू नका, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा”

मुंबई | महावीर जयंती, हनुमान जयंती आणि त्याचरात्री असलेल्या ‘शब्ब-ए-बारात’साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. यावर्षीची पूजाअर्चा, धार्मिक प्रार्थना सर्वांनी आपापल्या घरातच करावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मीय नागरिकांना केलं आहे.

राज्यात कोरोनारुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज ती साडेपाचशेच्या आसपास आहे. ज्या भागात रुग्ण आढळत आहेत, ते भाग सीलबंद केले जात आहेत, असं अजित पवरांनी सांगितलं आहे.

रेशनदुकानांमधून गरीबांना अन्नधान्याचा पुरवठा सुरु करण्यात आला आहे. बहुतांश नागरिक घरात थांबून लढ्यात योगदान देत आहेत. या संपूर्ण लढ्याला, रस्त्यावर फिरणाऱ्या, गर्दी करणाऱ्या मोजक्या मंडळींमुळे धक्का बसत आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर फिरु नये, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाविरुद्धची लढाई देश, देशवासियांच्या अस्तित्वाची लढाई असल्यानं येणाऱ्या काळात नियम, कायदे, आदेशांचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –

-धारावीत कोरोनाचा चौथा रुग्ण आढळला; मुंबईसाठी धोक्याचा इशारा

-वारकऱ्यांचा स्तुत्य आदर्श; एका आवाहनावर चैत्री वारी करणं टाळलं!

-कोरोनाची लागण झालेल्या बाळाची नर्सकडून करमणूक; ‘सलाम या वीरांना’ म्हणत जयंत पाटलांनी केलं कौतुक

-…म्हणून मुख्यमंत्र्यांनी केलं सोलापूरच्या सात वर्षीय आराध्याचं कौतुक!

-परराज्यातील मजुरांना मुख्यमंत्र्यांचं अभय; दिली ही महत्त्वाची माहिती