राष्ट्रवादीने जाहीर केली अजित पवारांची उमेदवारी!

मुंबई |  सध्याचं राजकारण गलिच्छ झालेलं आहे. 30-35 वर्ष काम केल्यावर, लोकांचे प्रश्न सोडवल्यानंतरसुद्धा निवडणुकीच्या तोंडावर गलिच्छ आरोप होतात. राजकारण सोडलेलं बरं, असं बाबा म्हणाल्याचं (अजित पवार) पार्थ पवार यांनी काल माध्यमांना सांगितलं होतं. त्यावर अजित पवार विधानसभा लढणार की नाही? अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र खुद्द राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच अजित पवारांची बारामतीमधून उमेदवारी जाहीर केली आहे.

आज पत्रकार परिषद संपल्यानंतर माध्यमांनी तुम्ही विधानसभा लढणार की नाही? असं प्रश्न जाताजाता अजित पवार यांना विचारला. त्यावर पवार साहेब आणि पक्षनेतृत्व जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार माध्यमांसोबत बोलत असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील तिथे उपस्थित होते. जयंत पाटलांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांच्या उमेदवारीसंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार नाही म्हटले तरी त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते त्यांना लढायला भाग पाडतील, असं पाटील म्हणाले.

आमच्या कुटुंबात कसलाही गृहकलह नाही. माध्यमांत आमच्या गृहकलहावर चर्चा होत आहेत. कृपया असं काही छापू नका, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांचं नाव कसलाही संबंध नसताना शिखर बँकेच्या चौकशीत आलं. त्याने मला वेदना झाल्या आणि म्हणून मी राजीनामा दिला, असं अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-