‘अरे गोपीचंदा… लायकी पाहून बोलावं’; अजित पवारांचं पडळकरांना उत्तर

सातारा | आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी पडळकरांवर सडकून टीका केली. ते साताऱ्यात बोलत होते.

आपली योग्यता काय? आपण बोलतो काय? याशिवाय आपण कुणाबद्दल बोलतोय? सूर्याकडे पाहून थुंकल्यावर थुंकी तोंडावरच उडते, अशा शब्दांत अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

लायकी नसलेल्या लोकांनी बोलणं योग्य नाही. आपल्या समाजात प्रसिद्धी मिळवण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. आपली पात्रता पाहून बोलावं. याशिवाय त्यांना जनतेनी जागा दाखवली आह, अशी टीका अजित पवारांनी केली आहे.

एखाद्याला नको तेवढं मोठं केल्याचा हा परिणाम आहे. पडळकरांचं बारामतीत डिपॉझिट जप्त झालं होतं, असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनावर इंजेक्शन निघालंय पण…; पाहा शरद पवार काय म्हणाले

-इतिहासात अशी इंधन दरवाढ मी पाहिली नाही- शरद पवार

-काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या घरी ED चा छापा

-देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर अजित पवार म्हणाले…

-पडळकरांच्या त्या जहाल टीकेवर शरद पवार अखेर बोलले, म्हणाले…