मी बंड केलं नाही… फक्त भूमिका घेतली- अजित पवार

मुंबई | मी बंड केलेलं नाही, मी एक भूमिका घेतली. मला जे काही बोलायचंय ते योग्य वेळ आल्यावर बोलेन, असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

मी नाराज नाही, मी शपथविधीला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना घेऊन मी शपथविधीला जाणार आहे. आज 7 जण शपथ घेतील. मी राष्ट्रवादीत होतो, आहे आणि राहणार, असं अजित पवार म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच हेच आमचे नेते आहेत. भाजपबद्दल नेहमी नेहमी विचारु नका. योग्य वेळ आल्यास मी सर्व गोष्टींचा खुलासा करणार आहे. त्यामुळे विनाकारण मीडियामध्ये काहीही पसरवू नका, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांचे नाव पुढे केले जात आहे. जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याचा मुद्द्यावरुन अजित पवार नाराज असल्याचं बोललं जातंय.

 

महत्वाच्या बातम्या