मुंबई | राजीनामा दिल्यानंतर मी शरद पवारांच्या नजरेला नजर मिळवू शकलो नाही, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर इथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर घडामोडींना वेग आला. राजीनामा का दिला? नक्की काय घडलं? हे सांगण्यासाठी अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या.
माझ्या सद्विवेकबुद्धीला स्मरून मी राजीनामा दिला. माझ्या समर्थकांना आणि पक्षातल्या लोकांना यामुळे त्रास दिला. त्यामुळे मी त्यांची माफी मागतो, असं अजित पवार यांनी यावेळी पाहिलं.
आमच्या घरामध्ये कोणताही गृहकलह नाही. शरद पवार आमच्या कुटुंबाचे कुटूंबप्रमूख आहेत. त्यांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असतो, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
मी आधीपण न विचारता राजीनामा दिलाय. जर मी पक्षातल्या सहकाऱ्यांना राजीनामा देतो असं सांगितलं असतं तर त्यांनी मला देऊ दिला नसता, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
…अन् भर पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या अश्रुंचा बांध फुटला! https://t.co/WTZLgYp3DG @AjitPawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 28, 2019
राष्ट्रवादीने जाहीर केली अजित पवारांची उमेदवारी; या मतदारसंघातून लढणार! https://t.co/PZ24ZAyLnC @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 28, 2019
“पवारसाहेबांची बदनामी मला सहन झालं नाही… म्हणून मी राजीनामा दिला” https://t.co/QWGQdVF1cF @PawarSpeaks @AjitPawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 28, 2019