“165 आमदारांचं पाठबळ तरी, दोघंच अख्ख्या महाराष्ट्राचे मालक झालेत”

पुणे | राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. दोघेच अख्ख्या महाराष्ट्राचे मालक झाले आहेत. त्यांना कोणालाही विचारायचं नाही, अशी टीका अजित पवारांनी केलीये.

लवकरात लवकर मंत्रीमंडळ विस्तार होणं गरजेचं आहे. 165 आमदारांचा पाठिंबा मिळालेला असूनही सरकार मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यासाठी का घाबरत आहे? असा सवाल केला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केलीये.

शिंदे सरकारकडून गुरुवारी राज्यातील पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रति लीटर आणि डिझेलच्या करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दरावरुन अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे.

मी अडीच वर्ष अर्थमंत्री राहिलोय. मागील अर्थसंकल्पात गॅसच्या किंमती प्रचंड प्रमाणत कमी केल्या होत्या. साडेतेरा टक्केंचा टॅक्स तीन टक्केंवर आणला होता. यामुळे हजार कोटींचा भार राज्य सरकारने उचलला होता. त्यावेळी विरोधी पक्षात असणारे हे लोक मागणी करत होते की, राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलला जितका टॅक्स लावते, ते 50 टक्के करा. विरोधात असताना मागणी करत होते, आता सत्तेत आल्यानंतर त्यांनी 50 टक्के टॅक्स कमी का नाही केला?, असा सवाल अजित पवारांनी केला आहे.

दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभागाला संचालक नेमला जातो. पण अद्याप तो नेमलेला नाही. आपल्याकडे अनेकदा महापूर येतो. पडझड होते. घरं पडतात. तसेच ढगफुटी होऊन तलाव फुटतात. त्यामुळे मदत व पुनर्वसन खात्याला पूर्णवेळ सचिव असणं गरजेचं असतं. मात्र अजूनतरी पूर्णवेळ सचिव यांना देता आला नाही, अशीही टीका अजित पवारांनी केलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ 

झपाट्याने पसरणाऱ्या मंकीपॉक्सने सर्वांचं टेंशन वाढवलं, धक्कादायक माहिती समोर 

92 नगरपरिषदांच्या निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! 

पत्रकार परिषदेत फडणवीसांनी हळूच कागदावर काहीतरी लिहिलं अन् शिंदेंकडे कागद सरकवला! 

शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; घेतला मोठा निर्णय