बळीराजाला हेलपाटे न मारावे लागता आमच्या सरकारनं कर्जमाफी दिली- अजित पवार

मुंबई | ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार महाविकास आघाडी सरकारतर्फे अर्थसंकल्प मांडत आहेत. अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडत आहेत.

शेतकऱ्यांना हेलपाटे न मारावे लागता सरकारनं कर्जमाफी दिली. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्याच्या विकासकामासाठी निधी मिळण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंतचं कर्जमुक्त योजना आणली. तसेच शासनाने महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली. नऊ हजार 35 कोटी रक्कम कर्जमाफीसाठी देण्यात आली आहे. 2 लाखापेक्षा जास्त पीककर्ज असणाऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर झाली. सर्व कर्ज भरून 2 लाखाचं कर्ज सरकार माफ करणार आहे. दोन लाखपर्यंत कर्जमाफी देणार, असं अजित पवारांनी सांगितलं.

दरम्यान, कर्जमाफीसाठी एकूण 22 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याचं काम सुरू असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे

महत्वाच्या बातम्या-

-नियमीतपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांचा दिलासा

-छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला?; मनसेनं घेतला आक्रमक पवित्रा

-पुण्याच्या महापौरांनी घेतला “कष्टाच्या भाकरी’चा आस्वाद

-अयोध्येत शरयु आरतीमध्ये उद्धव ठाकरे सहभागी होणार नाहीत!

-“अहो, काळजी नको हे सरकार आपसातील अंतर्विरोध अन् विसंवादातूनच पडेल”