‘झोपु’च्या नव्या कार्यालयावरुन अजित पवारांची नाराजी!

पुणे | पुण्यातील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. यावेळी इमारतीचं महिन्याचं भाडं 12 लाख रूपये असल्याने अजित पवारांनी आपल्या भाषणातून नाराजी व्यक्त केली.

‘झोपु’चे कार्यालय जास्त काळ राहू देणार नाही. महिन्याला 12 लाख रूपये म्हणजे वर्षाला दीड कोटी रूपये याचं भाडं सरकारला द्याव लागणार आहे. एवढ्या किमतीत स्वत:च कार्यालय तयार होईल. त्यामुळे उगाच जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नका, असं अजित पवारांनी आपल्या भाषनात म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी आपल्या भाषणात या कार्यालयाचे तोंडभरून कौतूक केलं. त्यानंतर मात्र अजित पवारांनी आपल्या भाषणात इमारतीच्या भाड्यावरून पवारांनी जाहिरपणे आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, आपल्या अजित पवारांच्या फटकेबाजीने कार्यक्रमात चांगलीच रंगत आली. जितेंद्र आव्हाडांनी आपल्या भाषणात अजित पवारांची जरा गंमत केली पण अजित पवारांनी त्यांच्या भाषणात गंमतीची व्याजासकट परतफेड केली.

 

महत्वाच्या बातम्या-

-देशाचे पंतप्रधान गांधीजींसमोर नतमस्तक होतात पण…- जितेंन्द्र आव्हाड

-मनसेत इनकमिंग सुरू; दोन दिग्गज नेत्यांनी केला प्रवेश

-मी महाराष्ट्राची लेकय; घाबरणारही नाही आणि गप्पही बसणार नाही- मानसी नाईक

-मुख्यमंत्रीसाहेब, तुम्हाला लाज वाटायला हवी- राजू शेट्टी

-मनसेत प्रवेश करताच जाधवांची गर्जना; ‘आता चंद्रकांत खैरे खासदार होणे नाही…!’