सिंचन घोटाळ्यात मी आरोपी नाही- अजित पवार

मुंबई | सिंचन घोटाळ्याच्या कोणत्याही एफआयआर अथवा आरोपपत्रांमध्ये मला आरोपी केलेलं नाही. त्यामुळे या घोटाळ्यात मी आरोपी नाही, मला आरोपी ठरविता येणार नाही. माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाला देता येणार नाही, असं परखड शपथपत्र मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर केलं.

मंत्री म्हणून कर्तव्य बजावताना मी कोणत्याही भ्रष्ट अथवा बेकायदा कृत्यात सहभागी झालेलो नाही. मंत्री आणि व्हीआयडीसीचा माजी अध्यक्ष या नात्याने मी सर्व नियमांचे पालन करूनच सार्वजनिक कर्तव्ये पार पाडली आहेत, असंही शपथपत्रात अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सिंचन घोटाळा प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कंत्राटदार अतुल जगताप यांनी केली आहे. तर जनमंचने याप्रकरणाची चौकशी न्यायालयीन आयोगाकडे सोपविण्याची विनंती करणारे अर्ज हायकोर्टात सादर केले आहेत. त्यावर उत्तर सादर करताना अजित पवार यांनी अत्यंत परखड आणि सर्व आरोप फेटाळणारे शपथपत्र दाखल केलं आहे.

दरम्यान, अतुल जगताप यांना न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा पर्यायी मार्ग उपलब्ध असताना त्यांनी थेट हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे त्यांची याचिका निकाली काढण्यात यावी, असंही पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-