राज्याचा अर्थसंकल्प सादर! नियमीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ‘इतक्या’ हजारांची मदत

मुंबई | राज्याच्या सर्वांगिण विकासाला गती देणारा अर्थसंकल्प विधिमंडळात राज्याचे अर्थमंत्री दरवर्षी सादर करत असतात. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे.

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अजित पवारांनी भाषणाच्या सुरूवातीलाच अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

कोरोना महामारीमुळं राज्याची बिघडलेली आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. राज्यात भरीव तरतूद करत आहोत, असं अजित पवार म्हणाले आहेत.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना 50 हजार रूपये मदत करण्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. यासाठी 10 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

राज्यात कोरोना असल्या कारणानं गतवर्षीच आम्ही शेतकऱ्यांना ही रक्कम देऊ शकलो नाही याची खंत आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केल्यानं नियमीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 युक्रेन-रशिया युद्धाविषयी सर्वात मोठी बातमी आली समोर

 “फडणवीस असे 10-20 शरद पवार खिशात घालून फिरतात”

  “मुंबई पालिकेवर शिवसेनेचाच झेंडा कायम राहणार”

  गोव्यातील विजयामुळे देवेंद्र फडणवीसांचं मुंबईत जंगी स्वागत

  निवडणुकांनंतर Petrol-Diesel दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर