आज आई असायला हवी होती; जयंत पाटील भावूक

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगलीचे आणि मराठा समाजातील नेते जयंत पाटील यांनी देखील शपथ घेतली. शपथविधी झाल्यानंतर जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत आज आई असती तर तिला खूप आनंद झाला असता, अशी भावनिक पोस्ट केली आहे.

महाराष्ट्राचा मंत्री म्हणून दिलेली जबाबदारी मी नम्रपणे स्वीकारतो. यापूर्वीच्या प्रत्येक शपथेनंतर आशीर्वाद द्यायला आई असायची. आज आई नाही, याची खंत आहे, असं भावूक ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

आई असती तर तिला खूप जास्त आनंद झाला असता. आई जिथं कुठं असेल तिथून मला पाहून नक्कीच आशीर्वाद देत असेल, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

जयंत पाटील यांचं ट्वीट-

 

 

 

महत्वाच्या बातम्या-