‘या’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास नरेंद्र मोदींसह उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार!

अहमदनगर |  पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी शेती, शिक्षण आणि सहकार क्षेत्रात संपूर्ण देशाला आपल्या विचारातून निर्णय प्रक्रियेची प्रेरणा दिली आहे. लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबद्ध केलेलं ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन  सोहळ्याची सध्या जय्यत तयारी चालू आहे.

हा प्रकाशन सोहळा व्हर्च्युअल रॅलीच्या रुपात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उद्धव ठाकरे आणि इतरही काही नेते या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

प्रकाशन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळत प्रवरानगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय राज्‍यमंत्री ना.रावसाहेब दानवे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशाेकराव चव्‍हाण, विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच पक्षांचे विद्यमान आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील लोकांना या कार्यक्रमात सहभागी होता येईल अशाप्रकारे या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे. कोरोना नियमावलीचे पालन करत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

तसेच समाज माध्यमांवर देखील हा कार्यक्रम सर्वांना पाहता यावा या उद्देशाने यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आहे.

या आत्मचरित्राचं प्रकाशन नरेंद्र मोदी दिल्ली येथून करणार आहेत. दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्यासह बाळासाहेब विखे यांनी काम केलं होतं. यामुळे बाळासाहेब ठाकरेंचे सपुत्र उद्धव ठाकरे यांना मी स्वतः जाऊन निमंत्रण देणार आहे, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

तसेच या आत्मचरित्राचं प्रकाशन बाळासाहेब विखे पाटील यांच्या हयातीतच व्हावं, अशी आमची इच्छा होती. मात्र, त्यांच्या तब्येतीच्या कारणानं ते शक्य झालं नाही. तसेच एप्रिल महिन्यातच हा प्रकाशन सोहळा होणार होता. मात्र, कोरोनामुळे ते शक्य झालं नाही, असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र असणाऱ्या बाळासाहेब विखे पाटील यांनी आपलं संपूर्ण जीवन समाज कार्यात घालवलं आहे. त्यांच्या याच सामाजिक कारकीर्दीचा आढावा त्यांनी ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्रात शब्दबद्ध केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘रियाला ‘त्या’ प्रकरणी ज्यांनी बदनाम केलं त्यांना सोडणार नाही’; पाहा कोणी दिली ही चेतावणी

मंदीत साधली संधी… या कारणामुळे चक्क मैदानावरच केला डान्स!

कंगना पुन्हा बरळली! शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर निशाणा साधत म्हणाली…

चौकार आणि षटकारांच्या फटकेबाजीत विराट कोहलीने ‘या’ खेळाडूंनाही टाकले मागे…!

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! सुशांतचा मित्र सॅम्युअलला ‘या’ व्यक्तीनं दिली जीवे मा.रण्याची ध.मकी