“शिवसैनिकांनो निराश होऊ नका बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा”

मुंबई| महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी शिवसैनिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेण्याचं आवाहन केलं आहे. बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा असं आवाहन करणारं ट्विट त्यांनी केलं आहे.

मनसे मोठे बदल करण्याच्या तयारीत असून उद्या म्हणजेच 23 जानेवारीला होणाऱ्या महाअधिवेशनात पक्षाची पुढील वाटचाल ठरवली जाणार आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याच पार्श्वभुमीवर अमेय खोपकर यांनी हे ट्विट केलं आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली सपक महाखिचडी..पण सच्च्या कार्यकर्त्यांनो, बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका. निर्लज्जपणे असाच सुरु राहील सत्तेचा खेळ. मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ. बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा”.

मनसेच्या नव्या झेंड्यात फक्त भगवा रंग असणार असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असणार आहे. या झेंड्याचा फोटोही समोर आला आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

-“…म्हणून मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढेंची बदली केली असावी”

“कितीही विरोध झाला तरी चालेल पण आता माघार नाही”

-मातोश्रीबाहेर आंदोलन करणारा ‘तो’ शेतकरी फडणवीसांच्या भेटीला

-“फक्त झेंड्याचा रंग बदलून चालणार नाही तर मनसैनिकांनी त्यांची मनं देखील बदलली पाहिजेत”

-“राहुल गांधीनी आधी स्वत:च्या आजीचा इतिहास सांगावा आणि मग सावरकरांवर बोलावं”