कोरोनाविरोधातली लढाई मिळून लढू; मोदी-ट्रम्प यांची फोनवरून चर्चा

नवी दिल्ली |  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फोनवरून विस्तृत्व चर्चा झाली. अमेरिका आणि भारतात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती पुर्ववत करण्यासंबंधी ट्रम्प-मोदी यांच्यात चर्चा झाली. (American President Donald trump And Indian pm narendra Modi Telephone Conversation)

भारत अमेरिका मिळून कोरोनाविरोधातली लढाई लढू, असं अमेरिकेचे राष्टाराध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. भारत आणि अमेरिकेच्या ताकदीचा उपयोग या लढाईत करू, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी यावेळी व्यक्त केला. (American President Donald trump And Indian pm narendra Modi Telephone Conversation)

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत माझी फोनवरून विस्तृत चर्चा झाली, असं मोदींनी ट्विट करून सांगितलं आहे. आमची चर्चा अतिशय उत्तम झाली. कोरोनाला हरवण्यासाठी भारत आणि अमेरिका पूर्ण ताकदीने मैदानात आहे, असा विश्वास आम्ही एकमेकांना दिल्याचं मोदींनी सांगितलं आहे. (American President Donald trump And Indian pm narendra Modi Telephone Conversation)

दरम्यान, भारतात कोरोनाचा प्रसार खूपच झटपटरित्या व्हायला लागला आहे. अगदी काहीच दिवसांत हा आकडा तीन हजार पार गेला आहे तर मृतांची संख्या देखील वाढते आहे. दुसरीकडे अमेरिकेला तर कोरोनाने पछाडलं आहे. दिवसेदिवस अमेरिकेची स्थिती बिकट होत चालली आहे. प्रतिदिवशी जवळपास सहाशे ते सातशे लोक मृत्यूमुखी पडत आहे.

महत्वाच्या बातम्या –

-अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितली मदत

-विरोधकांच्या टीकेनंतर कोरोनाच्या लढाईत पंतप्रधान मोदींचं महत्वाचं पाऊल!

-धक्कादायक, पुण्यात कोरोनाने घेतले आणखी दोघांचे बळी

-“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कौतुकास पात्र, माझा त्यांना सलाम”

-1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर