“कुणाच्या सांगण्यावरून मालिकेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही”

मुंबई | ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतरचे भाग वगळावे, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली होती. त्यावर अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी महाराजांच्या हत्येचा भाग वगळला असल्याचं आश्वासन दिलं, अशी माहितीही अर्जुन खोतकर यांनी दिली होती. त्यावर अमोल कोल्हेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांच्या छळाचा कोणताही भाग वगळणार असं कोणतही आश्वासन मी दिलं नाही. मालिकेत काय दाखवायचं आणि काय नाही याबाबत निर्माते नाही तर झी वाहिनी निर्णय घेते, असं अमोल कोल्हेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

मालिकेचं चित्रीकरण आधीचं पूर्ण झालं आहे. आवश्यक ती खबरदारी मालिकेच्या चित्रीकरणापूर्वीच घेतली आहे. त्यामुळे चिंता करु नये असं मी त्यांना सांगितलं आहे. त्यामुळे कोणतंही चूकीचं वृत्त प्रसारित केलं जाऊ नये अशी माझी विनंती आहे, असं अमोल कोल्हेंनी सांगितलं आहे.

गेली अडीच वर्षे मालिका सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीनं जबाबदारीनं आणि नैतिक कर्तव्यभावनेनं ही मालिकेची निर्मिती केली आहे. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे. परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळं कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असं मला वाटत नाही, असं कोल्हे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-महाविकास आघाडीत शिजतंय तरी काय?? वर्षावर मुख्यमंत्री-शरद पवार-अजित पवार तातडीची बैठक

-CAA विषय गहन… मुख्यमंत्र्यांना कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे; चव्हाणांची टीका

-इंदुरीकरांच्या वक्तव्याने आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे संकेत

-बरळणाऱ्या वारिस पठाणांच्या मदतीला धावले इम्तियाज जलील; म्हणाले…

-नीरेचं पाणी पेटलं… बारामतीला पाणी वळवल्याच्या निषेधार्थ आज फलटण बंद