पुणे महाराष्ट्र

होय शेरकर माझे मित्र, नाण्याची एकच बाजू ऐकण्यापेक्षा…- अमोल कोल्हे

पुणे | मनोरुग्ण, गरीब तसेच निराधार लोकांसाठी काम करणाऱ्या शिवऋण प्रतिष्ठानच्या अक्षय बोऱ्हाडे नामक तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. जुन्नरच्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेरकर हे खासदार अमोल कोल्हे यांचे जवळचे मित्र आहेत. अमोल कोल्हेंनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट करत याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

होय, सत्यजीत शेरकर आणि मी आम्ही दोघेही समाजकारणात येण्यापूर्वीपासूनचे चांगले मित्र आहोत. शेरकर यांना मी जवळून ओळखतो. आणि असं असलं तरीही कुणाला पाठीशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची सूचना मी पोलिस खात्याला संबंधित अधिकाऱ्यांना अधिच केलेली आहे, असं अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलंय.

सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या सामाजिक कार्यकर्ते अक्षय बोऱ्हाडे यांच्या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया तसेच फोन आले. माझी विनंती आहे की नाण्याची एकच बाजू ऐकून मत बनवण्यापेक्षा पोलीस खात्याला त्यांचं काम करू द्यावं आणि एकच बाजू ऐकून सोशल मीडिया ट्रायल करण्यापेक्षा कायदेशीर मार्गावर विश्वास ठेवावा, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर प्रसारीत होणाऱ्या व्हिडिओच्याआधारे जर आपण आपलं मत बनवायला लागलो तर या पुढच्या काळात राजकारणातील, समाजकारणातील एखाद्याची कारकिर्द त्या कारकिर्दीला पट्टा लावण्याचा, डाग लावण्याचा धोका पुढच्या काळात नाकारता येत नाही, असं अमोल कोल्हेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-दिलदार शेतकरी! आपल्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना घरी जाण्यासाठी विमानाची तिकीटं दिली काढून

-पक्ष, जात, कारखानदार किंवा मोठ्या घरचा मुलाहिजा न ठेवता कारवाई करा- संभाजीराजे

-…म्हणून 11 वर्षीय मुलीनं आपल्या आईविरोधातच दाखल केला गुन्हा