“नशीब 105 वर अडकले…. आता जर आम्हाला खेटले तर 15 पण निवडून येणार नाही”

मुंबई |   विरोधकांच्या जर हिम्मत असेल तर त्यांनी पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवावं, असं आव्हान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी फडणवीसांची खिल्ली उडवत टीकास्त्र सोडलं आहे.

फडणवीस तुम्ही हिम्मत कुणाची काढताय?? परत निवडणुका लागल्या तर पडता भुई थोडी होईल तुम्हाला, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे. नशीब झालेल्या विधानसभा निवडणुकीत 105 आमदार निवडून आले आता परत जर आम्हाला खेटले तर 15 पण निवडून येणार नाही, असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

अहो फडणवीस, हिंमतीची भाषा करायला जिगर लागते. आता ऊतू मातू नका…. आता 5 वर्ष फक्त ओरडत रहा, असं ट्वीट मिटकरी यांनी केलं आहे.

दरम्यान, येणाऱ्या काळात ठाकरे सरकारविरूद्ध मोठं आंदोलन उभं करणार असल्याचं भाजप नेते विनोद तावडे यांनी म्हटलं आहे तर राज्यात पुन्हा भाजपचं सरकार आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं फडणवीस म्हणाले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन नाही पण त्यांच्या पाठीशी- चंद्रकांत पाटील

-वारकरी सांप्रदाय संपवण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा डाव; इंदुरीकरांच्या समर्थनार्थ भाजप मैदानात

-इंदुरीकर महाराजांनी लिहिलं आपल्या लाखो चाहत्यांना पत्र; पत्रात म्हणतात…

-“शरद पवार हे मागासवर्गीय आणि आदिवासींच्या विरोधात आहेत”

-भाजपच्या मंचावरून मी शरद पवारांना चॅलेंज देतो की….- देवेंद्र फडणवीस