महाराष्ट्र

अमृता फडणवीस यांचं इंग्रजी गाणं सोशल मीडियावर ट्रोल!

मुंबई | शुक्रवारी जगभरात ‘व्हॅलेंटाईन डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी एक गाणं गायलं आहे. स्वतः अमृता फडणवीसांनी त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर हे गाणं शेअर केलं आहे. मात्र नेटकऱ्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केलं.

अमृता फडणवीसांनी व्हिडीओ शेअर करताना हे गाणं आपल्या आवडीचं असल्याचं म्हंटलं आहे. याआधीही त्यांनी अनेक गाणी गायली. त्यांच्या अनेक गाण्यांवरुन त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवल्याचं दिसतंय.

अमृता फडणवीसांनी गायलेलं हे इंग्रजी गाणं ‘लिओनेल रिची’चं कव्हर व्हर्जन आहे. अमृता फडणवीसांनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्वीटरवर हे नवं गाणं पोस्ट केलं आहे. शक्ती हासिजा यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध इंग्रजी गायक लिओनेल रिचीनं हे मूळ गाणं गायलं आहे.

गाण्यात लिओनेलने एका संगीत शिक्षकाची भूमिका साकारली आहे. या गाण्यात तो एका अंध मुलीच्या प्रेमात पडल्याचंही दाखवण्यात आलं आहे. हेच गाणं आता अमृता फडणवीस यांनी गायलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-शिवसेनेबरोबर आता पुन्हा सूर जुळणं कठीण- चंद्रकांत पाटील

-इंदुरीकरांची जीभ पुन्हा घसरली; शिक्षकी पेशाची खिल्ली उडविणारा व्हिडीओ व्हारयल!

-अरविंद सावंतांना लॉटरी; मिळाला मंत्रिपदाचा दर्जा!

-शपथविधी सोहळ्यासाठी केजरीवालांनी दिली मोदींना आमंत्रणाची हाक!

-कार्यकर्त्यांनो थोडं दमांनं घ्या; …नाहीतर बायको मला घरातून हाकलून देईल- अजित पवार