‘…तोपर्यंत आई-वडीलांच्या मालमत्तेवर मुलांचा हक्क नाही’; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई | आई-वडील हयात आहेत, तोपर्यंत मुलाला त्यांच्या मालमत्तेवर कोणताही हक्क सांगता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. याचिकाकर्त्या सोनिया खान यांनी त्यांच्या पतीची मालमत्ता विकायचं ठरवलं होतं. मात्र त्यांच्या या निर्णयाला मुलाने विरोध केला होता.

सोनिया खान यांना पतीच्या सर्व संपत्तीचे कायदेशीर पालक बनायचं होतं. त्यांचा पती अनेक दिवसांपासून आजारी आहे. सोनिया यांच्या याचिकेला मुलगा आसिफ खानने विरोध केला.

वडिलांचा फ्लॅट विकण्याच्या निर्णयावर त्याने आक्षेप घेतला. आजारी पित्याचा उपचार खर्च उचलण्यासाठी आईकडे इतर पर्याय आहेत. यासाठी फ्लॅट विकण्याची गरज नाही, असं म्हणणं आसिफच्या वकिलांनी मांडलं.

या युक्तिवादातून आसिफची द्वेषभावना दिसून आली आहे, असं निरीक्षण नोंदवत न्यायालयाने पतीची संपत्ती विकण्यास याचिकाकर्त्या सोनिया यांना परवानगी दिली.

न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील मुलाची चांगलीच कानउघाडणी केली. आसिफने आपल्या वडिलांची कधी काळजी घेतली हे सिद्ध करण्यासाठी आतापर्यंत एकही कागदपत्र सादर केलेले नाही. न्यायालयाने आसिफचे सर्व दावे तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

कोरोनाची चौथी लाट येणार?; तज्ज्ञांचा गंभीर इशारा 

“भाजपचेच 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच” 

माही दा नंबर सात! धोनीनं सांगितलं आपल्या जर्सी नंबरचं ‘ते’ रहस्य 

 “मी येतोय म्हटल्यावर निवडणुकीत रंग येतो, माझ्या इमेजचा फायदा…”

 आप करणार बेरोजगारी साफ! पंजाब सरकारनं युवकांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा