भाजपचा हा माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश!

मुंबई  | भाजपचे माजी आमदार अनिल गोटे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं कळतंय. आज शरद पवारांचा वाढदिवस असून हेच औचित्य साधत अनिल गोटे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मुंबईत दुपारी 12.30 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

अनिल गोटे यांनी एप्रिल महिन्यात पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. धुळे महानगरपालिका निवडणुकीपासून गोटे यांनी स्वपक्षाविरोधात आणि भामरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.

अनिल गोटेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. अनिल गोटे भाजप सोडतील, असं बोललं जात होतं. एप्रिलमध्येच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.

अनिल गोटे यांनी रावसाहेब दानवे यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा तर आमदारकीचा राजीनामा तत्कालीन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाठवला होता.

महत्वाच्या बातम्या-