नाव घेतल्याने कोणी हिंदुहृदयसम्राट होत नाही; शिवसेनेची बोचरी टीका

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका बदलत हिंदुत्वाची वाट धरली आहे. महाअधिवेशनाच्या भाषणावेळी ठाकरेंनी शिवसेनेवर नाव न घेता टीका केली होती. अशातच परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते अनिल परब यांनी मनसेवर टीका केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी हिंदुंसाठी जो त्याग केला. तसं योगदान दुसऱ्याने कोणी दिलं का?, असा प्रतिसवाल परब यांनी मनसेला केला. तसेच नाव घेतल्याने कोणी हिंदुहृदयसम्राट होत नाही, असं म्हणत परबांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

मनसेचा पूर्वीचा झेंडा हा विविध धर्मियांना आकर्षित करण्यासाठी वापरला होता. त्यामुळे आता नविन झेंडा घेतल्याने हिंदूंची मतं फिरणार नाही, असंही परब यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कायदा सुव्यवस्थेवर नारायण राणेंनी न बोललेलंच बरं. राणे काय बोलतात ह्यापेक्षा सरकार काय बोलतं, हे महत्वाचं आहे, असं म्हणत परबांनी राणेंनी नाईट लाईफवरून केलेल्या टीकेवर टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुणेकरांनो शिवभोजनाचा आस्वाद घ्यायचाय; ‘या’ ठिकाणी मिळणार 10 रुपयांत थाळी

-ग्रामस्थांनी ठेवला नवा आदर्श; सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

-याला म्हणतात संस्कार! रितेश आणि जेनेलियाच्या मुलांनी जिंकलं मन

-फडणवीसांनी गेली पाच वर्षे टोळी सरकार चालवले; संजय राऊतांची टीका

-भिंत ओलांडून चिदंबरम यांना अटक करणाऱ्या अधिकाऱ्याचा राष्ट्रपती पोलीस पदकानं सन्मान!