….म्हणून अण्णा हजारे आजपासून मौन धारण करणार!

अहमदनगर | देशात महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, अत्याचारग्रस्त महिलांना जलद न्याय मिळावा. तसेच निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांना त्वरित शिक्षा व्हावी, यासाठी आत्मक्लेष म्हणून शुक्रवारपासून ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी मौन धारण केले आहे.

अण्णांनी याबाबत एक पत्र प्रसिद्ध केले होते. गेल्या काही दिवसांपासून महिलांवर अन्याय-अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तसेच दोषींना शिक्षा होण्यास विलंब होत आहे आणि यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे, असं अण्णांनी पत्रात म्हटलं आहे.

सध्या देशात प्रत्येक राज्यात महिलांवर-युवतींवर अत्याचार होत असल्याचं समोर येत आहे. अशा घटनांमध्ये न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात जितके न्यायाधीश पाहिजेत तितके न्यायाधीश देशात किंवा राज्यात नाहीत. त्यामुळे न्याय मिळायला उशीर होत आहे, असंही अण्णा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जोपर्यंत निर्भयाच्या दोषींना फाशी होत नाही तोपर्यंत अण्णा मौन धारण करणार आहेत. 20 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून राळेगणसिद्धीमध्ये त्यांनी आत्मक्लेष सुरु केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-