पाकिस्तानच्या ‘चांद नवाब’चं वादळी रिपोर्टिंग; नवा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

कराची | ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने पत्रकार चांद नवाब यांचं पात्र रंगवलं होतं. मुळचे पाकिस्तानचे असलेले चांद नवाब पत्रकार यांचा एका व्हिडीओमुळे तुफान व्हायरल झाला होता.

रिपोर्ट करत असताना वारंवार प्रवासी आणि कॅमेरा मध्ये येतात आणि नवाब रिपोर्ट करू शकत नाहीत. हा कॉमेडी सीन प्रेक्षकांना हसायला लावतो. हा व्हिडीओ 2008 मधला होता.

चांद नवाब यांचा हा व्हायरल व्हिडिओ विकत घेण्यासाठी तब्बल 63 लाखाची बोली लागली होती. अशातच चांद नवाब यांचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

चांद नवाब कराचीमधील समुद्रकिनारी धुळीचे वादळ आणि थंड वाऱ्याची माहिती देत ​​आहेत. कराचीतील साहिल किनारा हवामान अतिशय थंड आहे, त्यामुळे दुबई किंवा परदेशात जाण्याची गरज नसल्याचं नवाब रिपोर्टिंग करताना म्हणतात.

त्याचबरोबर रिपोर्टिंग करताना दुबळे आणि लुकडे लोकं याठिकाणी येऊ नये, हवेनी उडून जातील, असंही नवाब यावेळी म्हणताना दिसत आहेत. त्यावेळी ते डोळे झाकून रिपोर्टिंग करत दिसत आहे.

पुढील 24 तास कराचीमध्ये समुद्रकिनारी थंड हवा वाहत राहील. तर तुम्ही इथे या आणि आनंद घ्या, असा सल्ला देखील चांद नवाब यांनी पाकिस्तानातील लोकांना दिला आहे.

त्याचबरोबर चांद नवाब उंटावर बसून देखील रिपोर्टिंग करताना दिसतात. उंटावर बसण्यापासून रिपोर्टिंग करताना मोठी कसरत चांद नवाब यांना करावी लागत आहे.

दरम्यान, पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या – 

तळीरामांसाठी खुशखबर! ‘ड्राय डे’च्या नव्या तारखा जाहीर, आता फक्त…

“भाजपनं आपल्या जन्माचा दाखला दाखवावा”; संजय राऊत संतापले

पुढील 2 दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ भागात थंडीच्या लाटेची शक्यता

देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले “युतीमध्ये असताना…”

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण