महाविकास आघाडीचा दणका; या निवडणुकीत भाजपचे सगळे उमेदवार पराभूत

मुंबई | भाजपाच्या हातातुन राज्यातील सत्ता गेल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्था तसंच कृषी उत्पन्न बाजर समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी होताना पाहायला मिळतीये. तर भाजपाची मात्र पीछेहाट होताना दिसत आहे.

याचाच अनुभव नुकत्याच पार पडलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC Election ) निवडणुकीमघ्ये भाजपाला आला आहे,कारण या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला असून भाजपला आपलं खातंसुध्दा उघडता आलेलं नाही. हातात सत्ता असताना मागील पाच वर्षांत राज्यातील सर्व लहान-मोठी सत्तास्थानं ताब्यात घेण्याची खेळी भाजपाने खेळली होती. मात्र आता त्यांचाच डाव त्याच्यांवरती उलटला आहे.

राज्यातील जिल्हा परिषदांनंतर राज्याच्या राजधानीत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपच्या पदरी पराभव आला आहे . बाजार समितीच्या सर्व विभागांवर सत्तारुढ महाविकास आघाडीनंच आघाडी घेतली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ३४ जिल्ह्यांमधून सुमारे ९३%मतदान झालं. 6 महसुल विभागांमधुन१२ शेतकरी व चार व्यापारी प्रतिनिधी निवडण्यासाठी हे मतदान झालं. एकूण ५८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. मात्र, खरी लढत ठाकरे सरकार आणि भाजप यांच्यामध्ये होती. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीनेच आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-धनगर समाज माझा आहे, जातीचं राजकारण बाजूला ठेवा आरक्षणासाठी एकत्र या- मुख्यमंत्री

-आरक्षणासाठी लढणाऱ्या धनगर आंदोलकरांवरचे गुन्हे मागे घेणार; ठाकरे सरकारची घोषणा

-मनसेत नुकतीच घरवापसी केलेल्या ‘या’ नेत्यावर अ‌ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

-चिडका विराट; सामना गमावल्यानंतर पत्रकारावर भडकला!

-पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय; शेलार आणि राष्ट्रवादीमध्ये ट्वीट वॉर