तुम्हीही सिंगल असण्याला कंटाळला आहात का? आजच स्वत:मध्ये करा हे बदल, लगेच मिळेल गर्लफ्रेंड!

मुलींना समजून घेणे फार अवघड असते. मुलींच्या मनात नेमके काय चालू आहे, हे कोणालाही समजू शकलेलं नाही. बहुतेक मुली खूप जास्त विनम्र असतात. त्या सर्वांशीच विनम्रतेने बोलतात. मात्र, मुलींच्या चांगल्या बोलण्यामुळे काहीवेळेस मुलांच्या मनात त्यांच्याविषयी गैरसमज तयार होतात आणि मुलं त्यांना प्रपोज करतात.

मात्र, मुलींच्या मनात तसे काही नसल्याने त्या मुलाला रिजेक्ट करतात. मग मात्र मुलांना खूप दु:ख होते. काहीवेळेस मुलाला एखादी मुलगी खूप आवडते पण तिला प्रपोज करण्याची मुलाची हिंमत होत नाही. यामुळे बहुतेक मुले सिंगल राहतात.

सिंगल असण्यामागे मुलांच्या काही सवयी देखील कारणीभूत असतात. तुम्हाला जर गर्लफ्रेंड हवी असेल तर तुम्ही तुमच्या सवयींमध्ये बदल केलाच पाहिजे. आज आम्ही तुम्हाला याच विषयी काही स्पेशल टिप्स देणार आहोत.

  • वेळ दवडू नका
    काही वेळेस अनेक मुलांना एखादी मुलगी आवडते. मात्र, समोरच्या मुलीला काय वाटेल या भि.तीने मुले मनातील भावना मुलीला बोलून दाखवण्यास घा.बरतात. तुम्ही जर एखाद्या मुलीवर मनपासून प्रेम करत असाल तर अजिबात वेळ दवडू नका. त्या मुलीला स्वत:च्या मनातील भावना बोलून दाखवा.
  • स्वत:मध्ये आनंद शोधा
    काही वेळा एखादा मित्र रिलेशनशिपमध्ये आहे, म्हणून मुले रिलेशनशिपमध्ये येऊ ईच्छितात. मात्र, जर तुम्हाला स्वत:ला एखादी मुलगी खरंच मनापासून आवडत असेल तरच नात्यात या. तुम्हाला जर टाईमपास करायचा असेल किंवा वेळ घालवायचा असेल तर अशा गोष्टिंमध्ये घालवा ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे. अशा गोष्टी करा ज्या तुम्हाला आनंद देतील. कारण जेव्हा तुम्ही स्वत:मध्ये आनंदी रहाल स्वत:वर प्रेम कराल तेव्हाच तुमच्यावर सुद्धा कोणी प्रेम करेल.
  • मनातल्या ईतर गोष्टींना दुर्लक्षित करा
    अनेकदा काही मुले बराच काळ सिंगल असतात. यावेळी अचानक एखादी सुंदर मुलगी भेटते आणि ही मुलगी आपली गर्लफ्रेंड असावी, असं मुलांना वाटतं. मात्र, जोपर्यंत त्या मुलीवर खरंच प्रेम होत नाही तोपर्यंत काहीही पाऊल ऊचलू नका. फक्त त्या मुलीचं सौंदर्य तुम्हाला आकर्षित करेत असेल तर मनातल्या ईतर गोष्टींना दुर्लक्षित करा आणि स्वत:ला वेळ द्या.
  • जास्त अपेक्षा ठेवू नका
    काही वेळेस अनेक मुलांना रिलेशनशिपमध्ये येण्याची खूप ईच्छा असते. मात्र, ते आपल्या जोडिदाराकडून खूप अपेक्षा ठेवतात. जर तुम्हाला सिरीयस रिलेशनशिपमध्ये रहायचं असेल तर जोडिदार सर्वगुण संपन्न असेल, ही अपेक्षा ठेवू नका. कारण कोणताही व्यक्ती सर्वगुण संपन्न नसतो. त्यामुळे जोडिदाराकडून अती अपेक्षा ठेवू नका.
  • सवयी बदला
    काही मुलांना हेच समजत नाही की आपण सिंगल का आहोत. मात्र, मुलांच्या काही सवयींमुळे मुली त्यांना डेट करण्यास नकार देतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या सवयी आणि रूटीनमध्ये थोडा बदल करण्याचा प्रयत्न करा. थोेडे फिरा, नवनवीन गोष्टी ट्राय करा. यामुळे तुम्ही देखील आनंदी रहाल.

महत्वाच्या बातम्या-

फार मोठ्या घसरणीनंतर अखेर सोन्याचे भाव स्थिरावले; वाचा ताजे दर

आणखी एक टिकटॉक स्टार काळाच्या पडद्याआड! राहत्या घरी केली आत्मह.त्या

गुगलची ‘ही’ खास सेवा होणार बंद; त्वरित बॅकअप न घेतल्यास तुमचा डेटा होणार डिलीट!

नेहा कक्करला आहे ‘हा’ आजार, स्वतःच केला खुलासा म्हणाली….

ध.क्कादायक! लग्नातील आचाऱ्यानं चपात्यांसोबत केला ‘हा’ घाणेरडा प्रकार, पाहा व्हिडिओ