कुछ दिन छुट्टी चाहिए… डॅडींचा सुट्टीसाठी अर्ज

नागपूर | कुख्यात डॉन अरूण गवळी यांनी पुन्हा एकदा पॅरोलची मागणी केली आहे. अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांची पत्नी आजारी असल्याच्या कारणानं त्यांनी 30 दिवसांची मागणी पॅरोल रजा मागितली आहे.

नागपूर विभागीय आयुक्तांनी अर्ज फेटाळल्यानंतर पॅरोलसाठी अरुण गवळीने उच्च न्यायालयात याचिका केली. न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

याआधीही अरूण गवळी 3 ते 4 वेळा जेलबाहेर आले होते. मुलाचं लग्न, आजारपण अशी कारणं देत अरुण गवळी जेलबाहेर आला होता. आता पॅरोल मंजूर झाल्यास पुन्हा अरुण गवळीला तुरुंगाबाहेर येण्याची संधी मिळणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा टप्पा पार पडल्यानंतर  30 एप्रिल 2019 रोजी गवळी पॅरोलवर मुंबईत आले होते.

महत्वाच्या बातम्या-

-राम मंदिराच्या ट्रस्टमध्ये ‘दलित’ असणार- अमित शहा

-मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर उद्धव ठाकरेंनी काढला चिमटा

-“गुदमरत राहण्यापेक्षा बरं झालं की माझ्या आई-बाबांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला”

-सोशल मीडिया अकाऊंटला ‘आधार कार्ड’ जोडून घेण्यावर मोदी सरकारचा मोठा खुलासा!

-‘ECONOMY त्रस्त, मोदी मस्त’; गायक विशाल दादलानीने लगावला मोदींना टोला