अखेर केजरीवालांची मंजुरी; कन्हैया कुमारविरुद्ध देशद्रोहाचा चालणार खटला

नवी दिल्ली | जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालणार आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकारने यासाठी मंजुरी दिली आहे. कन्हैया, उमर खालिदसह 10 जणांविरुद्ध हा खटला चालणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित प्रकर दिल्ली सरकारमुळे अडून होते. भाजपने यावरुन अरविंद केजरीवाल यांच्यावर वारंवार टीका केली होती. अखेर दिल्ली मुख्यमंत्र्यांनी देशद्रोहाचा खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. केजरीवाल यांनी यापूर्वीच असे संकेत दिले होते.

दिल्लीतील एका न्यायालयाने दिल्ली सरकारला या प्रकरणात विचारणा केली होती. देशद्रोहाचा खटला चालवण्यास मंजुरी देण्याबाबतचा स्टेटस रीपोर्ट ३ एप्रिलपर्यंत सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर केजरीवाल यांनी खटला चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, 9 फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमात कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्यसह 14 जणांनी  देशविरोधी घोषणांचे समर्थन केले व बेकायदा निदर्शने केले असल्याचा आरोप आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं तर…- देवेंद्र फडणवीस

-मुस्लीम आरक्षणासंदर्भात बोलताना बोळासाहेब थोरात म्हणतात…

-राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी ही 2 नावं निश्चित; या बड्या नेत्याला डच्चू?

-सरकारी कर्मचाऱ्यांचा 5 दिवसांचा आठवडा होण्याआधीच त्याविरोधात न्यायालयात याचिका

-पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; दहा रुपये भरा अन् पीएमपीचा प्रवास दिवसभर करा!